Coronavirus cases in Maharashtra: 332Mumbai: 167Pune: 37Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan-Dombivali: 9Thane: 9Navi Mumbai: 8Ahmednagar: 8Vasai-Virar: 6Yavatmal: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 12Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

सी लिंक वाहतुकीस खुला; अफवांवर विश्वास ठेऊ नका पोलिसांचं आवाहन


सी लिंक वाहतुकीस खुला; अफवांवर विश्वास ठेऊ नका पोलिसांचं आवाहन
SHARE

ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली असून, मध्य रेल्वेवरील वाहतूक मंदावली तर; पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ५ ते १० मिनिटे उशिराने सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे मुंबई महानगरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा मुंबईतील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विमानाची ये-जा ४० मिनिटे उशिराने होत आहे. वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


२४ तासांत पावसाचा जोर वाढणार

दक्षिण भारताला झोडपून टाकणारे ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या २४ तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ओखी चक्रीवादळ सध्या ताशी १८ किलोमीटर वेगाने ईशान्यकडे सरकत आहे. मुंबईपासून ४२० किलोमीटर अंतरावर असलेले हे वादळ हळूहळू गुजरातकडे सरकत आहे.


विमान, रेल्वे वाहतूक उशिरा

ओखी चक्रीवादळाचा मुंबईतील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विमानाची ये-जा ४० मिनिटे उशिराने होत आहे. वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २९ मिनिटे उशिराने सुरू आहे. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या