कांदिवलीत ऑइल टँकरला अपघात

 Kandivali
कांदिवलीत ऑइल टँकरला अपघात
Kandivali, Mumbai  -  

भरधाव वेगाने जाणा-्या एका तेलाच्या टँकरला अपघात झाल्याची घटना कांदिवली (पू.)  पश्चिम द्रूतगती महामार्गावर सेंट्रल ऑर्डेनंस डेपोजवळ शुक्रवारी पहाटे घडली. दहिसरच्या दिशेने जाणाऱा 20 हजार लीटर क्षमता असणारा तेलाचा टँकर पलटल्याने सर्व तेल रस्त्यावर पसरले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हा भरधाव टँकर दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. यात वाहनचालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस दलाच्या अथक प्रयत्न करून रस्त्यावर सांडलेले तेल पाणी आणि रेतीचा वापर करून धूतले व शुक्रवार सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे वाहतूककोंडी उद्भवली नसल्याची माहिती दिंडोशी अग्निशमन दलाचे अधिकारी दिनेश  खरटमल यांनी दिली.

Loading Comments