Advertisement

ओला, उबेर टॅक्सीचालक आक्रमक


ओला, उबेर टॅक्सीचालक आक्रमक
SHARES

मुंबई - ओला, उबेर कंपन्यांच्या जाहिरातीला भुललेल्या शेकडो टॅक्सीमालक-चालकांवर आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. महिन्याला 1 लाख ते 1 लाख 30 हजार कमवा अशा जाहिरातींना भुलून असलेली नोकरी सोडून अनेकांनी कर्ज काढून टॅक्सी खरेदी केली. सुरुवातीला तीन-चार महिने टॅक्सीचालक-मालकांना मोठा नफा झाला, पण त्यानंतर त्यांचा इंधनाचा, कर्जाचा हफ्ता आणि घर चालवण्याचा खर्च देखील निघेनासा झाल्याने त्यांच्यावर अखेर उपासमारीची वेळ आली आहे .

कंपन्यांनी आपली फसवणूक करत आपल्याला देशोधडीला लावल्याचं या टॅक्सीचालक-मालकांच्या लक्षात आल्यानं आता सर्व टॅक्सीचालक-मालक संघटीत झाले आहेत. यासाठी आता त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. शुक्रवारी ओला, उबेर टॅक्सीचालक-मालकांनी संप पुकारत कंपन्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आम्हाला ठराविक उत्पन्न मिळावेअशी टॅक्सीचालकांनी मागणी केली. 

दरम्यान, कंपन्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं सुमारे 500 टॅक्सीचालक-मालकांनी आझाद मैदानावर धडकत निदर्शनं केली. काहींनी जोपर्यंत कंपनी आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत टॅक्सी रस्त्यावर उतरवायची नाही असा निर्णय या ड्रायव्हर्सनी घेतला आहे. मात्र कर्जाचा हप्ता आणि घर चालवण्यासाठी दुसरा पर्याय नसल्यानं शनिवारी काही टॅक्सी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कंपन्यांविरोधातील हे आंदोलन पेटण्याचीही अधिक शक्यता आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा