Advertisement

जिल्हा बँकांना मोठा दिलासा, RBI स्वीकारणार जुन्या नोटा


जिल्हा बँकांना मोठा दिलासा, RBI स्वीकारणार जुन्या नोटा
SHARES

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये पडून असलेल्या जुन्या चलनातील 500, 1000 च्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वीकारणार आहे. अर्थ मंत्रायलाने याबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. मागच्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी तशी मागणी देखील केली होती. 


हे देखील वाचा - नाशिक जिल्हा बँकेला निधी द्या, छगन भुजबळ यांचे पणनमंत्र्यांना पत्र


8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर 30 डिसेंबर 2016 पर्यंत बँकांमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील, असे अर्थमंत्रालयाने म्हटले होते. पण नोटा बदलण्याची तारीख उलटून गेली असली तरी, मुंबईसह संपूर्ण राज्यात 27 जिल्हा बँकांकडे जुन्या नोटांचे 2 हजार 771 कोटी इतकी रक्कम पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज देणेही बँकांना कठीण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानता येईल. रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरुपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.


हे देखील वाचा - 'जिल्हा बँकांवर लावलेली बंदी मागे घ्या'


जिल्हा बँकांना दिलासा

नोटाबंदीनंतर देशातल्या 371 जिल्हा बँकांमध्ये चार दिवसांत 44 हजार कोटींची रक्कम जमा झाली. एकट्या महाराष्ट्रात 31 जिल्हा बँकांत 4 हजार 600 कोटींची रक्कम जमा झाली. यात जुन्या चलनातली रक्कम देशात 8 हजार कोटी तर, राज्यात 2 हजार 771 कोटी रुपये एवढी होती. एकीकडे रद्द नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारत नाही आणि दुसरीकडे ठेवीदारांना व्याज द्यावे लागते, अशी बँकांची अडचण झाली होती. नोटिफिकेशन जारी झाल्यामुळे पुढचे तीस दिवस ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहे.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली. या नोटा बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यासाठी 30 डिसेंबर 2016 पर्यंत मुदत देण्यात आली होती. ग्राहकांनी नोटा जमा केल्या असल्या, तरी बँकांकडे नोटा पडून आहेत. त्यामुळे बँकांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.


हे देखील वाचा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कडाडले


राज्यात किती जुन्या नोटा?

राज्यातील जिल्हा बँक


पडून असलेल्या जुन्या नोटा
32
5228 कोटी

सगळ्यात जास्त रक्कम असलेल्या चार जिल्हा बँका

ठिकाण (जिल्हा बँक)
रक्कम
पुणे जिल्हा बँक
811 कोटी
सातारा जिल्हा बँक
399 कोटी
नाशिक बँकेत
376 कोटी
चंद्रपूर

 356 कोटीडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय