Advertisement

'जिल्हा बँकांवर लावलेली बंदी मागे घ्या'


'जिल्हा बँकांवर लावलेली बंदी मागे घ्या'
SHARES

मुंबई - जिल्हा बॅंकांवर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यावर टाकलेली बंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली. आरबीआयच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खिळखिळीत होण्याची शक्यता आहे. शेतीमाल बाजारात येत असतानाच सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली. नवे चलन आणि 100 किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या नोटा बॅंकांमध्येच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे पैसे नसल्याचे कारण सांगून व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे भाव पाडल्याच्या असंख्य तक्रारी येतायेत. राज्य सरकारनं तातडीनं रिझर्व्ह बॅंकेशी संपर्क साधून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची अनुमती मिळवून द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा