Advertisement

चिंताजनक! मुंबईत परदेशवारी नसलेलेही ऑमिक्रॉनबाधित

मुंबईत ऑमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

चिंताजनक! मुंबईत परदेशवारी नसलेलेही ऑमिक्रॉनबाधित
SHARES

मुंबईत ऑमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्या देशात सर्वाधिक ऑमिक्रॉनचा संसर्ग आहे, त्या देशांतून मुंबईत आलेले प्रवासी आतापर्यंत ओमायक्रॉनबाधित आढळत होते. मात्र आता परदेश प्रवास न केलेलेही बाधित होत असल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये ऑमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने संसर्ग पसरल्यानंतर मुंबई विमानतळावर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास प्रशासनानं पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.

ऑमिक्रॉन संसर्ग असलेल्या अतिजोखमीच्या देशांमधून आलेल्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जिनोम सिक्वेंन्सिंग चाचणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानंतर परदेशातून आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आणि नंतर ऑमिक्रॉनबाधित आढळण्यास सुरुवात झाली.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ऑमिक्रॉन बाधित परदेश प्रवास नसलेलेही रुग्ण आढळून येत आहेत. पालिकेने ३१ डिसेंबरला दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधितांच्या जिनोम सिक्वेंन्सिंग चाचण्या करण्यात आल्या, त्यातील १६० जणांना ऑमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाला असून बहुतांश प्रवासी मुंबईबाहेरील आहेत.

मुंबईत डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. यामुळे पालिकेने २१ ते २३ डिसेंबरदरम्यान ३७५ कोरोनाबाधितांच्या जिनोम सिक्वेंन्सिंग चाचण्या केल्या. त्यातील १४१ जणांना ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे १४१ मुंबईचे नागरिक असून त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. या रुग्णांपैकी ८९ पुरुष तर, ५२ महिलांना संसर्ग झाला आहे.

१४१ पैकी ७ रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत, ३९ रुग्णांना सौम्य लक्षणे आणि ९५ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. ९३ रुग्णांनी लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. तर तीन रुग्णांनी लसीची एक मात्रा घेतली आहे.

मुंबईतील अंधेरी के-पश्चिम विभागात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉनचे रुग्णही वाढले आहेत. या वॉर्डात एकूण २१ ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ग्रँट रोड डी विभागात ११, माटुंगा एफ उत्तर विभागात १०, चेंबूर एम पश्चिम विभागात १० रुग्ण आढळून आले आहेत. तर सर्वात कमी मुलुंड टी विभागात १, कुर्ला एल विभागात २, कांदिवली आर दक्षिण विभागात २ रुग्ण आढळून आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा