परळमध्ये 'महिला सशक्तीकरण' कार्यक्रम

 Parel
परळमध्ये 'महिला सशक्तीकरण' कार्यक्रम
परळमध्ये 'महिला सशक्तीकरण' कार्यक्रम
परळमध्ये 'महिला सशक्तीकरण' कार्यक्रम
See all

परळ - जागतिक महिला दिनानिमित्त ओमकार फाऊंडेशनच्या वतीने तळागाळातील कर्तृत्वान महिलांसाठी प्रथमच परळ पूर्व येथील दामोदर हॉलमध्ये 'महिला सशक्तीकरण' या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून भारतातील पहिल्या महिला फायर-फायटर (अग्निशमन अधिकारी) हर्शिनी काणेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. तर अरुणा वर्मा, प्रसिद्ध बाईकस्वार लीना जैन, हर्षा मुखर्जी, रेखा वर्मा या महिला मान्यवरांनी देखील हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात नाटक, नृत्य स्पर्धा, फॅशन शो आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते. यात 400 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला असून, स्वतः प्रशिक्षणातून तयार केलेल्या वस्तू, फॅशन डिझायनिंग केलेले ड्रेस, ज्वेलरी आदी गोष्टी स्पर्धेतून सादर करण्यात आल्या. 

दरम्यान काही महिलांनी ज्वेलरी प्रदर्शन आणि कपड्यांच्या विक्रीचे स्टॉल हॉलच्या आवारात लावले होते. तर स्पर्धेत उतरलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिलांनी स्वयंरोजगार, व्यवसाय आणि नोकरीतील वेगवेगळ्या वाटा जोपासायला हव्यात आणि त्यासाठी आत्मविश्वासाने आणि चिकाटीने कार्यरत राहणे गरजेचे आहे असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला.

महिला दिनी तळागाळातील गरीब गरजू महिलांना स्वसक्षमीकरणातून आर्थिक व्यासपीठ मिळावं यासाठी फाउंडेशनच्या वतीने वस्तीपातळीवर कौशल्य वृद्धी अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. यात प्रशिक्षण घेऊन सक्षम झालेल्या महिलांना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी अनेक कार्यक्रम फाउंडेशनच्या वतीने वर्षभर राबविण्यात येत असतात.

Loading Comments