SHARE

रविवारी सकाळी एका महिलेनं कल्याण स्थानकात ट्रेनमध्ये दोन गोंडस बाळांना जन्म दिला. माता व दोन्ही बाळ सुखरुप अाहेत. पुढील उपचारासाठी त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


अाई, बाळांची प्रकृती चांगली

घाटकोपर येथील रहिवासी असलेली शेख सलमा तबस्सुम (३०) ही महिला रविवारी सकाळी एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. यावेळी त्यांना प्रसुती वेदना सुरू झाल्या. यामुळे तिचे कुटुंबीय चिंतेत अाले. कुटुंबियांनी तात्काळ याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर एक्स्प्रेस कल्याण स्थानकातच थांबवण्यात आली. कॉन्स्टेबल नीलम गौर, सुरेखा कदम यांच्यासह रेल्वे पोलीस आणि डॉक्टरांचं पथक कल्याण स्थानकात पोहोचले. मात्र, अाधीच शेख सलमा यांची एक्स्प्रेसमध्येच प्रसूती झाली व त्यांनी जुळ्यांना जन्म दिला. नवजात बालकांची आणि सलमाची प्रकृती चांगली असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.हेही वाचा -

एफवायची दुसरी मेरिट लिस्ट जाहीर

पालिकेनं करून दाखवलं! लाटांचा २०० मेट्रिक टन कचरा साडेतीन तासांत साफ 

संबंधित विषय
ताज्या बातम्या