Advertisement

कामगार रुग्णालय आग: १० जणांचे जीव वाचवणाऱ्या कर्मचाऱ्याचा गौरव

केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी कामगार रुग्णालयातील कर्मचारी सिद्धरामेश्वर हमनाबादे यांना कामगार मंत्रालयाकडून १ लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हे बक्षीस त्यांना देण्यात आलं आहे. रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

कामगार रुग्णालय आग: १० जणांचे जीव वाचवणाऱ्या कर्मचाऱ्याचा गौरव
SHARES

अंधेरी पूर्वेकडील कामगार रुग्णालया (ESIC)ला लागलेल्या आगीतून १० जणांचे प्राण वाचविणाऱ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला केंद्र सरकारकडून १ लाख रुपयांचं बक्षीस देऊन गौरविण्यात आलं आहे.

कामगार मंत्रालयाकडून गौरव

केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी कामगार रुग्णालयातील कर्मचारी सिद्धरामेश्वर हमनाबादे यांना कामगार मंत्रालयाकडून १ लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हे बक्षीस त्यांना देण्यात आलं आहे. रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

मोठा आदर्श

सिद्धरामेश्वर यांना पुरस्कार देताना गंगवार म्हणाले की, सिद्धरामेश्वर यांनी कर्तव्यदक्षतेचा मोठा आदर्श आपले सहकर्मचारी आणि कामगारांना घालून दिला आहे. त्यांच्या तत्परतेमुळेच १० जणांना नवीन आयुष्य लाभलं, ही नक्कीच दखल घेण्यासारखी बाब आहे.

कामगार रुग्णालयात १७ डिसेंबर २०१८ रोजी लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर ११७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. अजूनही शहरातील विविध रुग्णालयात या आगीत जखमी झालेल्या ११६ जणांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-

कामगार रुग्णालय आगीच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक

कामगार रुग्णालय आग: मृतांची संख्या ११ वर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा