Advertisement

कामगार रुग्णालय आग: मृतांची संख्या ११ वर

कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत जखमी झालेल्यापैकी काही जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत आणखी भर पडू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कामगार रुग्णालय आग: मृतांची संख्या ११ वर
SHARES

अंधेरी पूर्वेकडील कामगार (ESIC) रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढून ११ वर गेली आहे. शुक्रवारी एका ८ महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आगीत जखमी झालेल्यापैकी काही जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत आणखी भर पडू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


५३ जखमींना डिस्चार्ज

सोमवारी सायंकाळी ही भयानक आग लागली होती. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीने या आगीतून एकूण १७७ जणांना वाचवण्यात आलं होतं. तर ११६ जखमींना शहरातील ७ वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जखमींमध्ये लहान मुलांसोबत अग्निशमन दलाच्या जवानांचाही समावेश आहे. आतापर्यंत जखमींपैकी ५३ जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.


आरोपींना न्यायालयीन कोठडी

पोलिसांनी तक्रारदारांचा जबाब नोंदवल्यानंतर कामात हलगर्जीपणा करून इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल बुधवारी सायंकाळी निलेश मेहता आणि निलेश कांबळे अशा २ अभियंत्यांना ताब्यात घेतलं आहे. तर रुग्णालय प्रशासनातील आणखी ४ जणांची चौकशी सुरू केली आहे. या अटकेतील दोघांना अंधेरी न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयाने त्यांना १३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

कामगार रुग्णालयातील आगीप्रकरणी दोघांना अटक, मृत्यूचा आकडा दहावर

मुंबईत आगीचे सत्र सुरूच; एकाच दिवशी २ ठिकाणी आग



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा