कामगार रुग्णालयातील आगीप्रकरणी दोघांना अटक, मृत्यूचा आकडा दहावर

कामगार रुग्णालय आगप्रकरणी पोलिसांनी सायंकाळपर्यंत १७० जणांचे जबाब नोंदवले. त्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून रात्री उशिरा निलेश मेहता आणि निलेश कांबळे या दोघांना अटक केली.

कामगार रुग्णालयातील आगीप्रकरणी दोघांना अटक, मृत्यूचा आकडा दहावर
SHARES

अंधेरीतील कामगार (ESIC) लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढून दहावर पोहोचला आहे. या दुर्घटनेनंतर होली स्पिरिट रुग्णालयात उपचार घेणारे ६५ वर्षीय दत्तू किसन नरवडे यांचा मृत्यू गुरूवारी ९ वाजून ५ मिनिटांनी झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारीच या दुर्घटनेतील अन्य एका महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी निलेश मेहता आणि निलेश कांबळे या रुग्णालयातील २ कर्मचाऱ्यांना अटक केली असून ४ जणांची चौकशी अद्याप सुरू आहे.


१० जणांचा मृत्यू

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला सोमवारी भीषण आग लागली होती. या आगीत अग्निशमन दल आणि स्थानिकांनी मोठ्या शर्थीने रुग्णालयात अडकलेल्यांचे प्राण वाचवले. या आगीत सोमवारपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र बुधवारी आणि गुरूवारी या आगीत जखमी झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू झाला.


जबाब नोंदवले

या आगीनंतर अग्निशमन दलासह पोलिसांनी काही नमुने जप्त करत ते कलिन्यातील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले होते. तसंच अग्निश्मन दलाने आगीबाबत पाठवलेल्या अहवालानुसार एमआयडीसी पोलिसांनी ८ जणांच्या विशेष पथकाची स्थापना करत तपास सुरू केला. या पथकाने बुधवारी जखमी, जखमींचे नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी, प्रत्यक्षदर्शी तसंच रेस्क्यू टीमची चौकशी केली. पोलिसांनी सायंकाळपर्यंत १७० जणांचे जबाब नोंदवले. त्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून रात्री उशिरा निलेश मेहता आणि निलेश कांबळे या दोघांना अटक केली.


वेल्डरचा समावेश

या दोघांना गुरुवारी अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार असून त्यांची जास्तीत जास्त कोठडीची मागणी केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. याच गुन्ह्यांत हरिश आणि राकेश या दोन वेल्डरचा आरोपींमध्ये सहभाग करण्यात आला आहे. त्यांच्यावरही लवकरच अटकेची कारवाई केली जाणार आहे.हेही वाचा-

कामगार रुग्णालय आग : डिलिव्हरी बॉयनं वाचवले १० जणांचे प्राण

नर्सच्या प्रसंगावधानामुळे ७ नवजात बालकांना जीवदानRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा