SHARE

मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील कामगार रुग्णालयाच्या आगीत एकूण ८ जणांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या १७७ वर पोहोचली आहे. आगीमुळे रुग्णालयात धुराचं साम्राज्य पसरलं होत. परंतु ३ नर्सनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने ७ नवजात बालकांना जीवदान मिळालं आहे.


बाहेर पडणं अशक्य

संध्याकाळी चारच्या सुमारास जेव्हा रुग्णालयात आग लागली, तेव्हा ज्योती कांबळे, सीमा आणि प्राची या नर्स रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरील एनआयसीयूत (बाळाचं अतिदक्षता विभाग) जेवण करण्यास बसले होते. त्याचदरम्यान अचानक रुग्णालयात काम करणारे डॉक्टर अजित आमच्याकडे धावत आले. त्यांनी आम्हा तिघींना त्वरीत खोलीबाहेर पडा, असं सांगितलं. परंतु खोलीत ७ नवजात बालक असल्याने आम्हाला त्यांना तिथे ठेऊन बाहेर पडणं अशक्य होतं, असं ज्योती कांबळे यांनी सांगितलं.


२ बाळ व्हेंटिलेटवर

विशेष म्हणजे यातील २ बाळ व्हेंटिलेटवर असल्याने त्यांना तिथून हलवणं धोकादायक होत. त्यामुळे आम्ही तिघींनी ५ लहान मुलांना या विभागाच्या बाहेर नेण्याचा निर्णय घेतला. परंतु खाली मोठ्या प्रमाणात धूर असल्याने बाळांना खाली नेणं धोकादायक असल्यानं या बाळांच्या तोंडाला मास्क लावून डॉक्टरांच्या मदतीने आम्ही ५ बाळांना घेऊन रुग्णालयाच्या गच्चीत गेलो. आणि नंतर आम्ही दुसऱ्या बाजूने रुग्णालयातून बाहेर पडलो.


सर्व जण सुखरूप

खाली येताच एनआयसीयूत (बाळाचं अतिदक्षता विभाग) दोन लहान मुलं असल्याचं आम्ही अग्निशामक यंत्रणेला सांगितलं त्यांनी तातडीने त्याना बाहेर आणत कूपर रुग्णालयात दाखल केलं. ही सर्व मुलं सुखरूप असून त्यांच्या नातेवाईककडे त्यांना सुपूर्द करण्यात आलं आहे, असंही कांबळे यांनी सांगितलं.हेही वाचा-

कामगार रुग्णालयातील आगीत ८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

कामगार रुग्णालय आग: मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये द्या - खासदार गजानन किर्तीकरसंबंधित विषय
ताज्या बातम्या