SHARE

अंधेरी येथील कामगार रुग्णालयात सोमवारी लागलेल्या आगीत मृतांचा अाकडा ९ झाला अाहे. बुधवारी शीला मुरवेकर या महिलेचा सेव्हन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या घटनेत १७७ जण जखमी झाले अाहेत. आगीमुळे रुग्णालयात धुराचे साम्राज्य पसरलं होतं. त्यामुळे बाहेर न पडता अाल्याने इतके बळी गेले. मात्र, सिद्धू हुमनाबडे (२०)  डिलिव्हरी बॉयच्या प्रसंगावधानामुळं तब्बल १० जणांचा जीव वाचला आहे. 


अाग दिसताच धाव घेतली

 सिद्धू हा स्विगीची पार्सल्स डिलिव्हरी करतो. कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीवेळी तो त्या परिसरात पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. रुग्णालयाजवळून धूर येत असल्याचं दिसल्यानं तो तातडीनं बचावकार्यात सहभागी झाला. त्याने रुग्णांना बाहेर काढण्यासाठी रूग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याला लागून एक शिप्राणडी लावली. ही शिडी पाहताच एक ज्येष्ठ महिला त्यावरून उतरण्यासाठी प्रयत्न करू लागली. ती शिडीवर येत असताना अचानक खिडकीचा कठडा तुटला आणि त्या खाली पडल्या. परंतु इतरांना वाचवायचं असल्यानं  न घाबरता तो  इतरांना वाचवण्याच्या कामात सहभागी झाला. 


बचावकार्यात झोकून दिलं

रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर अग्निशमन दलाच्या जवानासोबत सिद्धूनं स्वत:लाही बचावकार्यात झोकून दिलं. अग्निशमन दलाच्या शिडीचा वापर करून त्यानं दगडाच्या सहाय्यानं रूग्णालयाची काच फोडली. आणि खिडकीच्या कठड्यावरून आत शिरून लोकापर्यंत पोहचून त्यांना बाहेर काढलं. बचावकार्य करताना धुरामुळे त्याला काहीच दिसत नव्हतं आणि श्वास घेण्यासही त्रास होतं होता. 


रूग्णालयात दाखल

बचावकार्याला तीन तास उलटल्यानंतर सिद्धूच्या नाका-तोंडात धूर गेल्यानं त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानं अग्निशमन दलाच्या जवानाना छातीत दुखत असल्याचं सांगितलं.  त्यानंतर त्याला अंधेरीतील सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.  सध्या सिद्धूची प्रकृती ठिक असून १५ तासांच्या उपचारानंतर सिद्घूनं जेवण केलं. त्याची प्रकृती सुधारत असून तो लवकरच बरा होईल, असं सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं.


हेल्मेट चोरीला

दहावी पास असलेला सिद्धू काकांसोबत अंधेरीत राहतो. यापूर्वी तो ऐरोलीत राहायचा. पण स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी मिळाल्याने तो अंधेरीत रहायला आला होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर सिद्धूला ऑक्सिजन मास्क लावला होता असं त्याचा भाऊ चंद्रकांत यानं सांगितलं. सिद्धू बचावकार्यात असताना त्याची बाइक आणि डिलिव्हरीच्या वस्तू तशाच होत्या. पण त्याचं हेल्मेट मात्र चोरीला गेल्याचं चंद्रकांत यांनी सांगितलं.हेही वाचा - 

कामगार रुग्णालय आग: मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये द्या - खासदार गजानन किर्तीकर
संबंधित विषय
ताज्या बातम्या