Advertisement

गोरेगाव NNP तील IT park जवळील रस्त्याची एक लेन बंद

गोरेगाव नागरी निवारा परिषद इथल्या IT park जवळील रस्ता खचला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. पहा व्हिडिओ

गोरेगाव NNP तील IT park जवळील रस्त्याची एक लेन बंद
SHARES

गोरेगाव नागरी निवारा परिषद इथल्या IT park जवळील रस्ता खचल्याची घटना सोमवारी रात्री घडली. नाल्याला लागून असलेला रस्ता खचला आहे. रस्ता खचल्यानंतर तिथे उभा असलेला ट्रकही रस्त्यात खचला. 

सध्या या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. पालिकेने सुरक्षेच्या कारणास्तव सोमवारी रस्ता खचलेल्या भागात बॅरिगेट्स लावले आहेत. इथल्या रहिवाशांना आणि वाहनधारकांसाठी एक भाग बंद करण्यात आला आहे. 

रहिवासी भाग तसेच इथे असलेल्या आयटी पार्क इथे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरी एक बाजू बंद असल्याने या भागात ट्राफिक वाढण्याची शक्यता अधिक आहे. 

नाल्यासगतच उभा असलेला ट्रक धसला. या रस्त्यालाच लागून अनेक खाण्याचे फूड स्टॉल पार्क असतात. यासोबतच इतर गाड्याही पार्क असतात. या घटनेवेळी उपस्थितांना मोठा आवाज आला. नागरिकांनी तात्काळ गाड्या बाजूला काढल्या. पण तोपर्यंत ट्रक रस्त्यात धसला होता. घाबरलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. 

इन्फिनिटी पार्क येथे रस्ता खचल्यामुळे आपत्कालीन विभाग यांच्या निर्देशानुसार बस मार्ग क्रमांक ६४६ चे प्रवर्तन अपना बाजार येथे 9.40 वाजल्यापासून खंडित करण्यात आले आहे.

खचलेला रस्त्याचा भाग हा नाल्याजवळील असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. जवळच आयटी पार्क आणि नागरी निवारा परिषदेच्या काही इमारती आहेत. मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून एक बाजू बंद करण्यात आली आहे. 

खचलेला भाग हा नाल्या जवळच आहे. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्याला लागून असलेला रस्ता रचल्याचे बोलले जात आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा