Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

दादर स्थानकात कोरोना चाचणी; एका प्रवाशाला लागण


दादर स्थानकात कोरोना चाचणी; एका प्रवाशाला लागण
SHARES

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. मात्र असं असलं तरी मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढतो आहे. त्यामुळं वेळीच खबरदारी घेऊन राज्य सरकारनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कोरोनाला आळा घालण्यासाठी बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याच निर्णय घेतला. त्यानुसार, मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत एका प्रवाशाला कोरोनाती लागण झाल्याची माहिती डॉ. प्रथमेश खाडे यांनी दिली.

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात सकाळी ६ वाजता सौराष्ट्र एक्सप्रेस आली असून, या रेल्वे गाडीतून आलेल्या १७५ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. १७५ प्रवाशांपैकी १३४ प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग (तापमान व ऑक्सिजन) करण्यात आली, तर ४० जणांची रॅपिड अॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली असून, त्याला होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉ. प्रथमेश खाडे यांनी दिली.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मुंबईतील रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू करण्यात आली आहे. परराज्यांतून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या बोरिवली, दादर, वांद्रे, कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं थांबतात. त्यामुळं या ६ रेल्वे स्थानकांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची पथकं तैनात करण्यात येणार आहेत.

या चाचणी वेळी अनेक प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सोमवारी राज्य सरकारनं दिल्ली, गुजरात, गोवा, राजस्थान येथून महाराष्ट्रात रेल्वे, विमानमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना तपासणीची करणयाचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानकांमध्ये कोरोना चाचणीची व्यवस्था केली जात आहे. पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, दादर इथं ४० गाड्या राज्याबाहेरून येतात. मुंबईत ४ राज्यातून दाखल होणाऱ्या प्रवाशांचा अहवाल पाहणी आणि तपासणीसाठी ६ मुख्य रेल्वे स्थानकांवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथकं तैनात करण्यात येणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा