गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा एक भाग विस्तारीकरणासाठी बंद

 Goregaon West
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा एक भाग  विस्तारीकरणासाठी बंद
Goregaon West, Mumbai  -  

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड एमटीएनएल उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडून पूर्वेला जाणाऱ्या भागाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे मंगळवारी 2 मे रोजी पश्चिमेकडून पूर्वेला जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गाला पर्याय म्हणून नागरिकांनी मालाड सब वे अथवा मृणालताई गोरे (राम मंदिर) उड्डाणपुलाचा वापर करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त संजय जाधव यांनी केले आहे.

Loading Comments