Advertisement

सिटी सेंटर माॅलमध्ये १ हजार अनधिकृत गाळे?

काही दिवसांपूर्वीच आगीत जळून भस्मसात झालेल्या मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर माॅलमध्ये १ हजार अनधिकृत गाळे असल्याचं आढळून आलं आहे.

सिटी सेंटर माॅलमध्ये १ हजार अनधिकृत गाळे?
SHARES

काही दिवसांपूर्वीच आगीत जळून भस्मसात झालेल्या मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर माॅलमध्ये १ हजार अनधिकृत गाळे असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे या अनधिकृत गाळ्यांवर तातडीने कारवाई करून याप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत नवीन बांधकामास परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली आहे.

सिटी सेंटर मॉलमध्ये २२ ऑक्टोबर रोजी लागलेल्या भीषण आगीत माॅलमधील शेकडो दुकाने आणि गाळे जळून खाक झाले आहेत. या आगीसंदर्भातील चौकशी अहवाल अग्निशमन दलाकडून बुधवारी स्थायी समितीला सादर करण्यात आला. या अहवालात सिटी सेंटर माॅलमध्ये १३४४ लहान-मोठे गाळे आढळून आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने माॅलमध्ये केवळ ३४४ गाळ्यांना परवानगी दिलेली होती. याचाच अर्थ उर्वरीत १ हजार गाळे अनधिकृतपणे बांधण्यात आले आहेत.

हेही वाचा- तब्बल ५६ तासांनी सिटी सेंटर मॉलमधील आग नियंत्रणात

अद्याप महापालिकेचा खातेनिहाय चौकशी अहवाल आलेला नाही. त्यातच माॅलमध्ये पुन्हा अनधिकृत गाळे उभारण्याची कामे सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. त्यावर मॉलमधील आगीची चौकशी पूर्ण होईपर्यंत माॅलमध्ये कुठलंही बांधकाम करू न देण्याचे तसंच माॅल बंदच ठेवण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी  प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान या आगीत बऱ्याच गोष्टी संशयास्पद असल्याने या आगीची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे आमदार आणि गटनेते रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. 

(one thousand illegal shops in city center mall at mumbai central says bmc)

हेही वाचा- सिटी सेंटर मॉलच्या वरच्या भागाचं अधिक नुकसान : पालिका


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा