Advertisement

पाणी जपून वापरा; तलावांमध्ये २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

मुंबईत मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याचा साठा कमी झाला असून, पुढील २० दिवसच पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

पाणी जपून वापरा; तलावांमध्ये २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
SHARES

मुंबईत मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याचा साठा कमी झाला असून, पुढील २० दिवसच पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळं भातसा आणि अप्पर वैतरणा या राज्य सरकारच्या तलावांतून मुंबईसाठी दररोज अडीच हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरू करण्यात आला आहे.

३,५१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमधून दररोज ३ हजार ६५० दशलक्ष लिटर पाणी जलशुद्धीकरण संकुलात आणलं जातं. शुद्धीकरणानंतर मुंबईकरांना ३ हजार ५१५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. कारण १३५ दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळं वाया जाते.

पाणीसाठा कमी 

पाणीसाठा कमी असल्यानं पालिकेनं नोव्हेंबर २०१८ पासून १० टक्के पाणीकपात सुरू केली आहे. मात्र, जून संपत आला, पुरेसा पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळं मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार धरणांत ७३ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळं मुंबईसाठी भातसा व अप्पर वैतरणातून राखीव साठा घ्यावा लागत आहे. भातसामधून दररोज २ हजार दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणातून ५०० दशलक्ष लीटर पाणी पालिका घेत आहे. मुंबईला रोज केल्या जात असलेल्या ३,५०० दशलक्ष लीटर पाण्यापैकी ७० टक्के पाणी आजघडीला भातसासह अप्पर वैतरणातून घ्यावं लागत आहे.

पाणीसंकटात वाढ

दरवर्षी साधारण ७ जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होतो. त्यानंतर दमदार पावसाला सुरुवात होऊन मुंबईकरांची तहान भागविणारे तलाव एकामागोमाग एक भरून ओसंडून वाहू लागतात. मात्र यंदा जूनमध्ये तुरळक सरी कोसळल्यामुळं मुंबईकरांच्या पाणीसंकटात वाढ झाली आहे.



हेही वाचा -

मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी अंतिम निकाल

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जातपडताळणीविना प्रवेश – विनोद तावडे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा