Advertisement

धारावीत शनिवारी आढळले अवघे ७ नवे रुग्ण

कोरोनाचा हाॅटस्पाॅट म्हणून ओळखल्या जाणार्‍या धारावीतील रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

धारावीत शनिवारी आढळले अवघे ७ नवे रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी कोरोनाचा हाॅटस्पाॅट म्हणून ओळखल्या जाणार्‍या धारावीतील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शनिवारी धारावीमध्ये कोरोनाचे केवळ ७ नवीन  रुग्ण आढळले आहेत.

धारावीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता २१५८ वर पोहोचली आहे. धारावीमध्ये १०५७ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. धारावीतील रुग्णांची संख्या आता बरीच कमी झाली आहे, गेल्या काही दिवसांपासून धारावी येथे कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झालेला नाही. धारावी, दादर आणि माहीमचा समावेश असलेल्या

 जी उत्तर वॉर्डात आतापर्यंत ३६९३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. दादरमध्ये शनिवारी कोरोनाचे ८ रुग्ण आढळले. दादरमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६३३ झाली आहे. तर माहीममधील रुग्णांचा आकडा ९०२ झाला आहे. 



हेही वाचा -

'असे' आहेत मुंबईतील कंटेन्मेंट झोन

मुंबईतील सील केलेल्या इमारतींची 'ही' आहे यादी




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा