गटारं उघडीच


 गटारं उघडीच
SHARES

धारावी - श्री गणेश विद्यामंदीर शाळेच्या परिसरात असलेली गटारे उघडीच आहेत. या गटारांत तुडूंब पाणी भरलंय. या गटारावर झाकण बसवावं आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केलीय. या परिसरात राहणाऱ्या 90 टक्के दक्षिण भारतीय महिला पापडाचा व्यवसाय करतात. घरं लहान - लहान असल्यामुळं या महिला घराच्या बाहेर बसून पापड लाटतात. परंतु या उघड्या गटारांमुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे या परिसरातील स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय.

संबंधित विषय