फुटपाथ की जीवघेणा खड्डा?

 Andheri
फुटपाथ की जीवघेणा खड्डा?
फुटपाथ की जीवघेणा खड्डा?
फुटपाथ की जीवघेणा खड्डा?
फुटपाथ की जीवघेणा खड्डा?
See all

अंधेरी - गेल्या अनेक दिवसांपासून लोखंडवालाच्या तारापोर उद्यान टॉवर आणि देना बँकेसमोरच्या फुटपाथवरच मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडते आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवासी पंढरी कांबळे यांना विचारले असता हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. याठिकाणी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या अनेक वयस्कर नागरिकांचा या खड्ड्यात पडून अपघात झाल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात अंधेरी के/पश्चिमचे सहाय्यक आयुक्त पराग मसूरकर यांना विचारले असता या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम ठेकेदारांना दिले आहे. त्यांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे असं म्हणत हात झटकले.

Loading Comments