ढक्कन गुल !


SHARE

चेंबूर - सेल कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यावरील मेनहोलचे झाकण गायब झाले आहे. त्यामुळे याठिकाणी एखादा अपघात होण्याची भिती रहिवाशांमध्ये आहे. गेल्या आठ दिवसापूर्वीच हे झाकण तुटले होते. याबाबत मनसेचे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितिन नांदगावकर यांनी अनेकदा पालिकेकडे तक्रार केली. पालिका दुर्लक्ष करीत असल्याने रहिवाशांनीच या मेनहोलच्या खड्ड्यामध्ये लाकडी बांबू टाकून त्यावर लाल कपडा लावून ठेवला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या