विजेच्या तारेची टांगती तलवार

 Chembur
विजेच्या तारेची टांगती तलवार

चेंबूर - अनेक दिवसांपासून चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मार्ग, गीताभवन उपहारगृहाजवळ एक वीजेची तार फुटपाथवर पडलीये. रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही विजेची तार अशी उघड्यावर टाकल्याचं तिथले दुकानदार नसीम शेख यांनी सांगितलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाला लागूनच चेंबूर रेल्वे स्थानक, पोस्ट कार्यालय, एम पश्चिम पालिका विभाग, डायमंड उद्यान, रिलायन्स वीज बिल भरणा कार्यालय, जॉय रुग्णालय तसंच जैन मंदिर, बुद्धविहार, विविध बँकाची एटीएम आहेत. साहजिकच इथे दिवसरात्र वर्दळ असते. ही तार जमिनीखालून टाकण्यात यावी अन्यथा रिलायन्सच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा निब्बाण शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे हरेश तांबे यांनी दिला आहे.

Loading Comments