Advertisement

महापालिकेच्या अर्थसंकल्पावर विरोधकांचा सभात्याग


महापालिकेच्या अर्थसंकल्पावर विरोधकांचा सभात्याग
SHARES

महापालिकेच्या अर्थसंकल्पात रुग्णालयांचे शुल्क वाढवतानाच मुंबई बाहेरील रुग्णांना अधिक शुल्क आकारण्याच्या मुद्द्यावर महापालिका आयुक्तांनी आपल्या निवेदनात कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपासह विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पाचा निषेध म्हणून सभात्याग केला.


विरेाधी पक्षनेते नाराज

मुंबई महापालिकेच्या सन २०१८-१९चा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी मांडल्यानंतर यावर सभागृहात चर्चा सुरू होती. तब्बल ४४ तास चाललेल्या या अर्थसंकल्पीय चर्चेत १३६ सदस्यांनी भाग घेतला होता. मंगळवारी रात्री महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या निवेदनानंतर या अर्थसंकल्पाचा महसूली उत्पन्नाचा भाग मताला टाकण्यात आला. परंतु, आयुक्तांच्या निवेदनामध्ये दरवाढ आणि शुल्कवाढ याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्यामुळे विरेाधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत तीव्र विरोध केला.


विरोधी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग

विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आणि सपा गटनेते रईस शेख यांनी समर्थन केले. त्यामुळे या अर्थसंकल्पाला आपला विरोध असून मुंबईकरांवर दरवाढ आणि शुल्कवाढ लादल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाला विरोध तसेच निषेध म्हणून सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. यावेळी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर उत्पनाच्या बाजुस मंजुरी देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा