Advertisement

मुंबईत शुक्रवारी 21 जुलैला ऑरेंज अलर्ट जारी

ठाणे, पालघर आणि रायगडसाठी रेट अलर्ट

मुंबईत शुक्रवारी 21 जुलैला ऑरेंज अलर्ट जारी
SHARES

मुंबई आणि परिसरात बुधवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. मात्र, मुसळधार पावसाचा हा त्रास सध्या कमी होण्याचे नाव घेत नाही. मुंबईत 21 जुलै रोजी हवामान खात्याकडून ओरँज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर आणि रायगडसाठी 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

21 जुलै रोजी रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३-४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होईल. अशात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा आयएमडी मुंबईकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढच्या २४ तासांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असून यामुळे राज्यात ऑरेंज आणि काही भागांना रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, महाबळेश्वर, पुणे, लोणावळा आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल.

तर या ५ भागांना आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर बरसलेल्या दमदार सरींमुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे अनेक मार्ग बंद पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना सुटी जाहीर करण्याचे केले आहे.



हेही वाचा

सध्या घोडबंदर मार्गावरून प्रवास टाळा, पोलिसांचे आवाहन

मुंबईतील लोकल ट्रेन आणि बस सेवेसंदर्भात सर्व माहिती एका क्लिकवर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा