SHARE

२१ ऑक्टोबर हा दिवस देशभरात पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी हॉट स्प्रिंग्ज या सीमावर्ती भागात गस्त घालत असताना चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात १० पोलिस शिपाई शहीद झाले होते. त्या दिवसांपासून २१ आॅक्टोबर हा दिवस स्मृति दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने मुंबईतल्या नायगाव पोलिस मुख्यालयाजवळील हुतात्मा मैदानात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.


 शहिदांना सलामी

अतिरेकी, नक्षलवादी, दहशतवादी हल्ल्याला सामोरे जात निष्ठेने सेवा बजावत दरवर्षी कित्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वीरगती प्राप्त होते. या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी २१ आॅक्टोबर रोजी विनम्र अभिवादन केलं जाते. मुंबई पोलिसांच्या नायगाव येथील मुख्यालयाजवळी हुतात्मा मैदानात स्मृती दिनामित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यावेळी हुतात्मा मैदानातील पोलिस स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं जातं. याशिवाय महाराष्ट्र पोलिस दलामार्फत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहिदांना सलामी दिली जाते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या