Advertisement

कसाबला पकडणाऱ्या १४ अधिकाऱ्यांना पदोन्नती

या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.

कसाबला पकडणाऱ्या १४ अधिकाऱ्यांना पदोन्नती
SHARES

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या त्या १४ पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. या अधिकाऱ्यांना शौर्यपदकाने गौरवविण्यात आले होते.

अजमल कसाब याला जिवंत पकडताना तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आलं होतं. शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासह १४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले होते. त्यांना शौर्यपदकाने गौरवविण्यात आले होते. या सर्व १४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना आता पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तब्बल चार वर्ष हा खटला चालल्यानंतर कसाबला २१ नोव्हेंबरला फासावर लटकवण्यात आले.


 मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या हल्यात मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळस्कर, अशोक कामटे, हेमंत करकरे, पोलीस निरीक्षक शशांक शिंदे, उपनिरीक्षक प्रकाश मोरे, बापुराव धरगुडे, सहायक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे, बळवंत भोसले, शिपाई अर्जुन चित्ते, विनय खांडेकर, जयवंत पाटील, अंबादास पवार, योगेश पाटील, राहुल शिंदे यांनाही जीव गमवावा लागला. तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. या हल्यावेळी घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने कसाबला पकडले म्हणून  त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय राज्यसरकारकडून घेण्यात आल्याचे देशमुखांनी सांगितले.



हेही वाचा -

बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी भाजप नेते नरेंद्र मेहता हायकोर्टात

महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी ४८ विशेष न्यायालय स्थापन करणार - अनिल देशमुख




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा