Advertisement

बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी भाजप नेते नरेंद्र मेहता हायकोर्टात

बलात्काराच्या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असलेले भाजपचे ​माजी आमदार नरेंद्र मेहता​​​ (bjp ex mla narendra mehta) यांनी आपल्यावरील सर्व गुन्हे रद्द व्हावेत यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी भाजप नेते नरेंद्र मेहता हायकोर्टात
SHARES
Advertisement

बलात्काराच्या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (bjp ex mla narendra mehta) यांनी आपल्यावरील सर्व गुन्हे रद्द व्हावेत यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मेहता यांच्या याचिकेवर ९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. मीरा-भाईंदर पोलीस ठाण्यात मेहता यांच्याविरोधात बलात्कार आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा- भाजप नेते नरेंद्र मेहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स (mira bhayander bjp corporator neela soans) यांनी मीरा-भाईंदर शहरातील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Bjp leader Narendra mehata) यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नीला सोन्स यांनी स्वत: मेहता यांचं स्टिंग आॅपरेशन करून तो व्हिडिओ भाजपच्या (bjp) वरिष्ठ नेत्यांना पाठवला होता. परंतु भाजपच्या वरिष्ठांकडून योग्य ती दखल न घेण्यात आल्याने त्यांनी मेहतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. नरेंद्र मेहता यांच्यापासून आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र सोन्स यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिलं होतं.  

यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी स्वत: हा मुद्दा उचलत भाजप (bjp) या विषयावर गप्प का आहे? असा सवाल उपस्थित केला हाेता. तसंच याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन मेहता यांच्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पाठोपाठ मेहता यांच्यावरील आरोपांवरून महाविकास आघाडी सरकारनंही (maha vikas aghadi) विधिमंडळात भाजपला घेरलं होतं.

याची दखल घेऊन अखेर मीरा-भाईंदर पोलिसांनी गेल्या आठवड्यात मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप लक्षात घेता मेहता यांच्यावर भादंवि अंतर्गत 376(2), (n), 376 (2), 496, 417, 232, 504, 506, 34 तसंच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार कायदा 3(1) (w), अनुसूचित जाती, जमाती कायदा 3(2)(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- नरेंद्र मेहतांच्या विषयावर भाजप गप्प का? निलम गोऱ्हेंचा सवाल

नरेंद्र मेहता यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत, राजकीय संन्यास घेतला होता. मेहता सध्या फरार आहेत. याप्रकरणी अटकेची शक्यता असल्याने गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकवेर न्यायालय काय निर्णय देते, यावर मेहता यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement