Advertisement

नरेंद्र मेहतांच्या विषयावर भाजप गप्प का? निलम गोऱ्हेंचा सवाल

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Bjp leader Narendra mehata) यांच्यावर भाजपच्याच एका नगरसेविकेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.

नरेंद्र मेहतांच्या विषयावर भाजप गप्प का? निलम गोऱ्हेंचा सवाल
SHARES

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Bjp leader Narendra mehata) यांच्यावर भाजपच्याच एका नगरसेविकेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे पीडित नगरसेविकेने याबाबत भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार करुनही भाजप (bjp) या विषयावर गप्प का आहे? असा सवाल शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे (shiv sena mla neelam gorhe) यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- फडणवीसजी आधी माफी मागा, आदित्य ठाकरे संतापले

विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार निलम गोऱ्हे (shiv sena mla neelam gorhe) म्हणाल्या, नरेंद्र मेहता (Bjp leader Narendra mehata) यांच्याविरोधात अनेक महिलांनी आपल्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यांना भाजपच्या वरिष्ठांकडून धमकावण्यात येत आहे. त्यामुळे यासंबंधी गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांना भेटून मी सर्वात आधी नरेंद्र मेहता यांच्या चौकशीची मागणी करणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून पीडित महिलांना न्याय मिळेल. मंगळवारी दिवसभर आंदोलन करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष या विषयावर गप्प का आहेत? याचाही त्यांनी खुलासा करायला हवा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. 


भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी मीरा-भाईंदर शहरातील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Bjp leader Narendra mehata) यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.  मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नीला सोन्स यांनी स्वत: मेहता यांचं स्टिंग आॅपरेशन करून तो व्हिडिओ भाजपच्या (bjp) वरिष्ठ नेत्यांना पाठवला होता. परंतु भाजपच्या वरिष्ठांकडून योग्य ती दखल न घेण्यात आल्याने त्यांनी मेहतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. नरेंद्र मेहता यांच्यापासून आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा- वीर सावरकरांचं देशासाठी मोठं योगदान- अजित पवार

नरेंद्र मेहता यांनी २ दिवसांपूर्वीच भाजपच्या जबाबदारीचा राजीनामा देत, राजकीय संन्यास घेतला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा