Advertisement

भाजप नेते नरेंद्र मेहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे चर्चेत आलेले भाजपचे वादग्रस्त माजी आमदार नरेंद्र मेहता (bjp leader narendra mehta) यांच्यावर अखेर बलात्काराचा (rape case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते नरेंद्र मेहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
SHARES

लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे चर्चेत आलेले भाजपचे वादग्रस्त माजी आमदार नरेंद्र मेहता (bjp leader narendra mehta) यांच्यावर अखेर बलात्काराचा (rape case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते असं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- नरेंद्र मेहतांच्या विषयावर भाजप गप्प का? निलम गोऱ्हेंचा सवाल

भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स (mira bhayander bjp corporator neela soans) यांनी मीरा-भाईंदर शहरातील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Bjp leader Narendra mehata) यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते.  मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नीला सोन्स यांनी स्वत: मेहता यांचं स्टिंग आॅपरेशन करून तो व्हिडिओ भाजपच्या (bjp) वरिष्ठ नेत्यांना पाठवला होता. परंतु भाजपच्या वरिष्ठांकडून योग्य ती दखल न घेण्यात आल्याने त्यांनी मेहतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. नरेंद्र मेहता यांच्यापासून आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही सोन्स यांनी केला आहे.

यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी स्वत: हा मुद्दा उचलत भाजप (bjp) या विषयावर गप्प का आहे? असा सवाल उपस्थित केला हाेता. तसंच याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन मेहता यांच्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पाठोपाठ मेहता यांच्यावरील आरोपांवरून महाविकास आघाडी सरकारनंही (maha vikas aghadi) विधिमंडळात भाजपला घेरलं होतं.

हेही वाचा- कोण होणार महापालिकेतील विरोधीपक्ष नेता?

याची दखल घेऊन अखेर मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भाजप नगरसेविकांनी लावलेले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप लक्षात घेता मेहता यांच्यावर भादंवि अंतर्गत 376(2), (n), 376 (2), 496, 417, 232, 504, 506, 34 तसंच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार कायदा 3(1) (w), अनुसूचित जाती, जमाती कायदा 3(2)(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा