Advertisement

कोण होणार महापालिकेतील विरोधीपक्ष नेता?

येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महापालिकेतील पक्षाची कार्यकारिणी गुरूवारी जाहीर केली. या कार्यकारिणीत पक्षाच्या गटनेतेपदी आणि विरोधीपक्ष नेतेपदी दोन वेगवेगळ्या नेत्यांची निवड करून भाजपने स्वत:चीच पंचाईत करून घेतली आहे.

कोण होणार महापालिकेतील विरोधीपक्ष नेता?
SHARES

येऊ घातलेल्या मुंबई महापालिका (bmc) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (bjp) महापालिकेतील पक्षाची कार्यकारिणी गुरूवारी जाहीर केली. या कार्यकारिणीत पक्षाच्या गटनेतेपदी आणि विरोधीपक्ष नेतेपदी (bmc opposition leader) दोन वेगवेगळ्या नेत्यांची निवड करून भाजपने स्वत:चीच पंचाईत करून घेतली आहे.  

हेही वाचा- महापालिकेने केला ८ दिवसांत १२५ कोटींचा मालमत्ता कर वसूल

भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (bjp mumbai president mangal prabhat lodha) यांनी मुंबई महापालिकेतील पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत भाजपचा गटनेता म्हणून विनोद मिश्रा (vinod mishra), उपनेता म्हणून उज्ज्वला मोडक, रिटा मकवाना, मुख्य प्रतोद म्हणून सुनील यादव, भाजप गटाचे प्रभारी म्हणून भालचंद्र शिरसाट आणि विरोधी पक्षनेते म्हणून प्रभाकर शिंदे (corporator prabhakar shinde) यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. 

महापालिकेत गटनेता हाच पक्षाचा प्रमुख मानला जात असल्यामुळे त्याची विरोधी पक्षनेतेपदासाठी (bmc opposition leader) शिफारस होऊ शकते. परंतु भाजपने विरोधी पक्षनेता आणि गटनेता अशा दोन पदांवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींची निवड केल्याने प्रशासनासोबतच खुद्द भाजप नगरसेवकही गोंधळात पडले आहेत. भाजपतर्फे कार्यकारिणी निवडीचं पत्र महापौर किशोरी पेडणेकर (mumbai mayor kishori pednekar) यांना पाठवण्यात आलं असून त्यात प्रभाकर शिंदे यांच्या नावाची विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात घोषणा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना (shiv sena) क्रमांक एकचा, तर भाजप (bjp) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. भाजपने शिवसेनेसोबत मिळून सत्तेत बसण्यास नकार दिल्याने भाजपला विरोधी पक्षात बसण्याची संधी होती. परंतु आम्ही पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहणार असल्याचं म्हणत भाजपने ही संधी नाकारली. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा (congress opposition leader ravi raja) यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. 

हेही वाचा- बनावट बुटांची विक्री करून लोकांची फसवणूक

असं असताना भाजपने विरोधीपक्ष नेते म्हणून प्रभाकर शिंदे (corporator prabhakar shinde) यांच्या नावाची निवड करून गोंधळात भर पाडली आहे. मुंबई महापालिका निवडणूक २ वर्षांवर येऊन ठेपलेली असताना भाजपने महापालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामागची रणनिती म्हणूनच प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या रवी राजा (ravi raja) जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत शिंदे यांच्या नावाची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा करता येणार नाही. त्यामुळे सर्वकाही काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा