बनावट बुटांची विक्री करून लोकांची फसवणूक

नामांकित कंपनांच्या नावे बनावट चपला आणि बुटांची विक्री करून लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला आहे.

बनावट बुटांची विक्री करून लोकांची फसवणूक
SHARES

मुंबईसह अनेक भागातील तरण मंडळींचा कमी किंमतीत ब्रॅंडेड वस्तू (Branded goods) वापरण्याकेड जास्त कल असतो. चार-चौघात आपलं स्टेटस (Status) पडू नये, यासाठी तरूण मूल व मुली ब्रॅंडेड वस्तू वापर करतात. मात्र, ब्रँडेड वस्तूंचं प्रचंड आकर्षण असलेल्या तरुणाईसाठी एक महत्वाची बातमी आहे. प्युमा तसंच, इतर नामांकित कंपनांच्या (Company) नावे बनावट चपला आणि बुटांची (Slippers and boots) विक्री करून लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा गुन्हे शाखेनं (Crime Branch) पर्दाफाश केला आहे.

मुंबईतील कुर्ला परिसरातील ६ दुकानांमध्ये छापा टाकत गुन्हे शाखेनं ३४ लाखांचे बनावट बूट आणि चपला हस्तगत कल्या आहेत. याप्रकरणी ३ पुरवठादारांसह पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. कुर्ला पश्चिमेकडील किशोर फुटवेअर, सचिन फुटवेअर, सुफियान फुटवेअर, साजिद फुटवेअर, योगेश फुटवेअर आणि सुनील फुटवेअर या दुकानांतून प्युमा तसेच इतर नामांकित कंपन्यांचे लोगो वापरून बूट आणि चपला विकल्याली जात असल्याची तक्रार प्युमा कंपनीच्या वतीनं करण्यात आली होती.

या तक्रारीची गंभीर दखल घेत लोकांची फसवणूक करणाऱ्या या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेनं पथकं तयार केली. या दुकानांमध्ये एकाच वेळी छापा टाकून २४ लाखांचे बनावट बूट आणि चपला हस्तगत केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणात अल्तमाश शेख, योगेश जैस्वाल, सचिन कानडे, स्वप्नील गुंठले, साजिद शेख, किशोर अहिरे, सचिन कानडे या सहा विक्रेत्यांना अटक केली.

या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता हे ६ जण मशिद बंदर येथील २ पुरवठादारांकडून हा मुद्देमाल घेत असल्याचं समजलं. पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी छापा टाकून आणखी १० लाखांचे बनावट बूट आणि चपला जप्त केल्या. बनावट वस्तू विक्री करणारी मोठी साखळी कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.



हेही वाचा -

मेट्रो-३ मार्गातील मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण

मोटरमनच्या सतर्कतेमुळं टळली मोठी दुर्घटना



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा