Advertisement

मोटरमनच्या सतर्कतेमुळं टळली मोठी दुर्घटना


मोटरमनच्या सतर्कतेमुळं टळली मोठी दुर्घटना
SHARES

रेल्वेनं (Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. यामध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत असून, असे अपघात (Accidents) रेल्वे मार्गावर सतत घडत असतात. मात्र, काहीवेळा रेल्वे स्थानकातील (Railway Station) रेल्वे पोलीस व प्रवासी या प्रवाशांच्या मदतीला धावून येतात व त्यांना जीवदान देतात. अशीच घटना हार्बर रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकात घडली आहे.

मोटरमनच्या (motaramana) सतर्कतेमुळं हार्बर मार्गावरील (Harbour Railway) जोगेश्वरीजवळ (Jogeshwari Station) मोठी दुर्घटना टळल्याची घटना उघडकीस आली आहे. महापालिकेकडून (BMC) जोगेश्वरी स्थानकाजवळ जेसीबीच्या (JCB) मदतीनं शौचालय (Toilet) पाडण्याचं काम गुरुवारी सुरू होतं. त्यावेळी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शौचालयच्या बांधकामाचा काही भाग गोरेगाव (Goregaon) हार्बर लोकलच्या रुळांवर कोसळला.


अचानक चालत्या लोकलसमोर रुळांवर पडलेला ढिगारा पाहून मोटरमननं क्षणार्धात लोकलचं आपत्कालीन ब्रेक कार्यान्वित केलं आणि मोठा अनर्थ टळला. या गोंधळामुळं लोकल वाहतूक काही मिनिटं बंद करण्यात आली होती. रुळांवरील ढिगारा बाजूला केल्यानंतर लोकलसेवा पूर्ववत करण्यात आली.

याप्रकरणी रेल्वे रुळांजवळील बांधकाम पाडण्यापूर्वी महापालिकेने रेल्वेला कोणताही पूर्वसूचना दिली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. भविष्यात रुळांजवळ कोणतंही पाडकाम करताना रेल्वेची परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या २९ वर्षीय प्रवाशाला सीएसएमटी-पनवेल लोकलवरील मोटरमन व गार्डनं मदतीचा हात दिला. विनायक परब असं या तरुणाचं नाव आहे. या जखमी तरुणाला लोकलमधून प्रवाशांच्या मदतीनं कुर्ला स्थानकापर्यंत नेलं. त्यानंतर त्याच्यावर महापालिकेच्या सायन रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले. वेळेत रुग्णालयात तरुणाला दाखल केल्यानं त्याचं प्राण वाचले. 



हेही वाचा -

आरपीएफच्या खांद्यावर कॅमेरे, रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

मध्य रेल्वेवर ४ तासांचा मेगाब्लॉक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा