Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

आरपीएफच्या खांद्यावर कॅमेरे, रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

रेल्वे परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आरपीएफच्या खांद्यावर बॉडी वॉर्न कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

आरपीएफच्या खांद्यावर कॅमेरे, रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
SHARES

रेल्वे प्रवाशांचा (Railway Passenger) प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वे (Railway) प्रशासनाकडून अनेक सविधा दिल्या जात असून, उपक्रमही राबविले जात आहेत. मात्र, रेल्वे स्थानकात (Station) आणि लोकलमध्ये (Local) दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता अपघात व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. या गर्दीचा फायदा घेऊन चोर प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, मोबाईल व पाकीट चोरत आहेत. यामध्ये प्रवाशांच मोठ नुकसान होत आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.

रेल्वे स्थानकातील गर्दी, प्रत्येक घटनेची माहिती रेकॉर्ड (Record) करण्यासाठी आणि रेल्वे परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आरपीएफच्या खांद्यावर बॉडी वॉर्न कॅमेरे (Body Warne Cameras) बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गावरील सुरक्षा (Security) व्यवस्थेत आणखी वाढ होणार आहे.

रेल्वे परिसरात प्रवाशांना जास्तीत जास्त सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं प्रशासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवरच हे कॅमेरे (Camera) बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याची क्षमता १० मेगापिक्सल इतकी असून त्यात ३२ जीबीपर्यंत डाटा साठवता येणार आहे

रात्रीच्या वेळी नाइट व्हिजन कॅमेरा (Night Vision Camera) सुरू करता येणार आहे. आरपीएफ जवानांच्या खांद्यावर हे कॅमेरे लावल्यानं नजीकच्या परिसरासह दूरवरचं छायाचित्रणही टिपण्यास मदत होणार असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली आहे. रेल्वेच्या बॉडी वॉर्न कॅमेरे या सुविधेमुळं प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

मुंबईत फिल्मी स्टाइलने दरोडा, चौघांना अटक

मुंबई पोलिसांना स्वत:च्या मालकीचं घर कधी? कालिदास कोळंबकर यांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषणRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा