Advertisement

मुंबई पोलिसांना स्वत:च्या मालकीचं घर कधी? कालिदास कोळंबकर यांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषण

वडाळ्यातील भाजप आमदार कालिदास कोळंबकर (bjp mla kalidas kolambkar) गुरूवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकदिवसीय उपोषणाला बसले होते.

मुंबई पोलिसांना स्वत:च्या मालकीचं घर कधी? कालिदास कोळंबकर यांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषण
SHARES

मुंबईतील पोलिसांना शासकीय दरानं स्वत:च्या मालकीचं घर (Home for mumbai police), गिरणी कामगारांना ५०० चौरस फुटांचं घर (home for mill worker) कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित करत वडाळ्यातील भाजप आमदार कालिदास कोळंबकर (bjp mla kalidas kolambkar) गुरूवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकदिवसीय उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाची (hunger strike) दखल घेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. 


हेही वाचा- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न मिळाल्याचं शल्य- छगन भुजबळ

  • मुंबईतील पोलिसांना शासकीय भावाने स्वत: च्या मालकीचं घर मिळावं, या संदर्भातील प्रस्ताव मुंबई पोलीस आयुक्त (mumbai police commissionar) यांनी शासनाकडे सादर केला असून त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी.
  • ३३/९ अंतर्गत एन.टी.सी. व गिरण्यांच्या जागेवर राहत असलेल्या गिरणी कामगारांना ५०० चौरस फुटांचं घर मिळावं
  • तसंच नायगाव येथील बी. डी. डी चाळीतील रहिवाशांना इतर कुठेही स्थलांतरित करू नये, 

अशा मागण्यांसाठी कालिदास कोळंबकर (bjp mla kalidas kolambkar) यांनी एक दिवसांचं लाक्षणिक उपोषण (hunger strike) विधानभवनाच्या (vidhan bhavan) पायऱ्यांवर बसून केलं. मागील अनेक वर्षांपासून कोळंबकर या मागण्यांचा पाठपुरावा करत आहेत. 

त्यांच्या उपोषणाची माहिती मिळताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी त्यांची भेट घेतली. कालिदास कोळंबकर हे सभागृहातील सर्वात वरिष्ठ सदस्य आहेत. ते वरील मागण्याचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या मागण्यासंदर्भात गृहनिर्माण विभागाची संयुक्त बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचा राज्य सरकार लवकरात लवकर प्रयत्न करेल, असं आश्वासन आव्हाड यांनी यावेळी दिलं.

हेही वाचा- राज ठाकरेंनी शेअर केला काश्मिरी तरूणीचा व्हिडिओ, जाणून घ्या यामागील कारण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा