Advertisement

मेट्रो-३ मार्गातील मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गासाठी मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण झालं आहे.

मेट्रो-३ मार्गातील मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण
SHARES

मुंबईतील कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ या महत्वाकांशी प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गासाठी मिठी नदीखालील (Mithi river) भुयारीकरण पूर्ण झालं आहे. नदीपात्रापासून १४ मीटर खोल भागात ९० मीटर लांबीच्या अवाढव्य ‘टनेल बोअरिंग मशिन’द्वारे (TBM) हे काम पूर्ण करण्यात आलं आहे. तसंच, या मार्गातील धारावी (Dharavi) स्थानकापर्यंतचं भुयारीकरण जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.

मिठी नदी नदीचं पात्र २५० मीटर असून, भोवतालचा परिसर हा कांदळवन आणि दलदलीचा असल्यामुळं या टप्प्यातील भुयारीकरण आव्हानात्मक होतं. त्यामुळं या संपूर्ण मार्गिकेसाठी ‘टिबीएम’च्या जोडीनं ‘अर्थ प्रेशर बॅलन्सिंग’ तंत्र वापरल्याचं समजतं. ‘टीबीएम’च्या साहाय्यानं आपल्याला हवा तेवढा भाग खोदताना चहुबाजूंनी येणाऱ्या दाबानुसार खोदकामाचा वेग नियंत्रित केला जातो.

वांद्रे-कुर्ला संकुल ते विद्यानगरी या टप्प्यात मिठी नदी शेजारून वाहत असल्यामुळं तेथे देखील हेच तंत्र वापरलं जात आहे. देशातील अशाप्रकारचा नदीखालील भुयारीकरणाचा हा दुसरा प्रकल्प आहे. वांद्रे-कुर्ला संकुल हे ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील सर्वात मोठं स्थानक आहे. मेट्रो सेवेची वारंवारीतादेखील या स्थानकात सर्वाधिक असणार आहे.

या स्थानकात गाड्यांचा मार्ग बदलण्यासाठी अप आणि डाऊन मार्गाव्यतिरिक्त तिसरी मार्गिकादेखील बांधण्यात येत असून, इथं ४ फलाटांची योजना करण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल हे ‘मेट्रो मार्ग २’ डिएन नगर ते मंडाले या स्थानकाशी थेट जोडण्यात येणार असून, प्रवाशांना स्थानकातूनच परस्पर थेट ‘मेट्रो २’च्या मार्गावर जाता येणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल ते धारावी भुयारीकरण

  • अप मार्गावरील १.४८ किमीपैकी २०० मीटर भुयारीकरण बाकी, ८७ टक्के काम पूर्ण.
  • डाऊन मार्गावरील १.४८ किमीपैकी ५०० मीटर भुयारीकरण बाकी, ६५ टक्के काम पूर्ण.
  • वांद्रे कुर्ला संकुल स्थानकात मेट्रो गाडीचा मार्ग बदलण्यासाठी १.५३ किमीची दोन भुयारे. पैकी एक भुयार मिठी नदीच्या खाली.

मिठी नदी ते मेट्रो भुयार

  • मिठी नदीपात्राच्या पृष्ठभागापासून ते मेट्रोच्या भुयाराच्या तळापर्यंतचे अंतर सुमारे २० ते २४ मीटर.
  • मिठी नदीच्या तळापासून ते मेट्रो भुयाराच्या वरच्या टप्प्यापर्यंतचे अंतर ९ मीटर. भुयाराचा व्यास ६.२ मीटर



हेही वाचा -

आरपीएफच्या खांद्यावर कॅमेरे, रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

मुंबईचं कमाल तापमान एका महिन्यात २ वेळा ३८ अंशावर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा