Advertisement

८ दिवसांत १२५ कोटींचा मालमत्ता कर महापालिकेने केला वसूल

कर थकवणाऱ्यांच्या घरातील फर्निचर (furniture), टीव्ही (tv), फ्रीज (freeze) आदी वस्तू जप्त करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

८ दिवसांत १२५ कोटींचा मालमत्ता कर महापालिकेने केला वसूल
SHARES

मालमत्ता कर (property tax) वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कंबर कसली आहे. कर थकवणाऱ्यांच्या घरातील फर्निचर (furniture), टीव्ही (tv), फ्रीज (freeze) आदी वस्तू जप्त करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. परिणामी नामुष्की टाळण्यासाठी अनेकांनी कर भरण्यास सुरूवात केली आहे. मागील ८ दिवसांत पालिकेने १२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. 

मालमता कर (property tax) थकबाकीदारांवर महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) कडक कारवाई केली जात आहे. कर न भरणाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांसमोर पालिकेचे कर्मचारी ढोलताशे वाजवत आहेत. याशिवाय इमारतींचं पाणीही कापण्यात आलं आहे. आता थकबाकीदारांची दुचाकी, चारचाकी वाहन, घरातील फर्निचर (furniture), टीव्ही (tv), फ्रीज (freeze), कम्प्युटर आदी वस्तू ताब्यात घेतल्या जाणार आहेत. घरातील सामान जप्त होणार असल्याने थकबाकीदारांवर नामुष्की ओढवणार आहे. तसंच समाजात नाचक्कीही होईल, या भितीने अनेक थकबाकीदारांनी कर भरला आहे. 

मालमत्ता कराची (property tax) वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्याने पालिकेचे आर्थिक गणित डळमळीत झाले आहे. चालू आर्थिक वर्षात ५५०० कोटींचा मालमत्ता कर मिळवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत फक्त ३१५४ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मालमत्ता कराची वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक विकासकांना कमी निधी मिळाला आहे.  घरातील सामान जप्त करण्याचा इशारा पालिकेने दिल्यापासून थकबाकीदारांनी कर भरण्यास प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे  तीन ते चार दिवस तरी थेट घरातील मालमत्ता जप्त करण्याबाबत पालिकेने सबुरीचे धोरण स्वीकारलं आहे. त्यानंतर मात्र प्रत्यक्ष जप्तीला सुरूवात होईल. 



हेही वाचा -

मालमत्ता कर थकबाकीदारांच्या वस्तू पालिका जप्त करणार

मेट्रो-३ मार्गातील मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा