Advertisement

'सेव्ह जॉगर्स पार्क': पे-अँड-पार्क संकल्पनेच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

विशेषत: वांद्रे, खार आणि सांताक्रूझ येथील मॉर्निंग वॉकर्स, जॉगर्स आणि कुटुंबे मोठ्या संख्येने उद्यानाला भेट देतात.

'सेव्ह जॉगर्स पार्क': पे-अँड-पार्क संकल्पनेच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम
SHARES

भाजप आमदार आशिष शेलार यांनी जॉगर्स पार्कबाहेर पे-अँड-पार्क योजनेच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. या स्वाक्षरी मोहिमेत सोमवारी, 30 जुलै रोजी वांद्रे इथल्या स्थानिक रहिवाशांनी देखील सहभाग घेतला.

स्थानिक रहिवाशांनी स्थापन केलेल्या 'सेव्ह जॉगर्स पार्क ग्रुप'ने या योजनेला विरोध केला आहे. पे अँड पार्कला विरोध दर्शवण्यासाठी या मोहिमेदरम्यान 250 हून अधिक लोकांनी सह्या केल्या.

स्थानिक नागरिक जॉगर्स पार्कसमोरच मोकळ्या जागेत आपली वाहने फुकटात पार्क करत असत. मात्र, आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ऑन-स्ट्रीट पे आणि पार्क सुविधेसाठी कंत्राट दिले आहे. जॉगर्स पार्कजवळील रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांना आता शुल्क आकारले जात आहे.

ट्विट करत आशीष शेलार म्हणाले की, “मी BMC च्या वांद्रे जॉगर्स पार्क येथे सुरू केलेल्या पे एन पार्क सुविधेला विरोध करतो. सर्व नागरिकांना माझ्या स्वाक्षरी मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करतो. पे एन पार्कचा निर्णय मागे घेण्यासाठी बीएमसी आयुक्तांना उद्देशून केलेल्या याचिकेवर स्वाक्षरी करा! न्याय मिळावा यासाठी बीएमसीकडे पाठपुरावा करू!”

"वांद्रे जॉगर्स पार्क येथे महापालिकेने सुरू केलेल्या 'पे अँड पार्क'ला आमचा विरोध असून आम्ही महापालिका आयुक्तांना निवेदन देणार आहोत. उद्यानात येणाऱ्या लोकांचा हा निषेध स्थानिक रहिवाशांसह थेट पालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवली आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,” असे त्यांनी ट्टिट करत म्हटले.

दरम्यान, या टीकेला उत्तर देताना बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रस्त्याच्या एका बाजूला पे-अँड-पार्क योजना नागरिकांच्या फायद्यासाठी आणि शिस्त आणण्यासाठी राबविण्यात येत आहे.

विशेषत: वांद्रे, खार आणि सांताक्रूझ येथील मॉर्निंग वॉकर्स, जॉगर्स आणि कुटुंबे मोठ्या संख्येने उद्यानाला भेट देतात.



हेही वाचा

महाराष्ट्रात लाडकी बहिन योजनेअंतर्गत महिलांना 3 सिलिंडर मोफत

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंतादायक : हायकोर्ट

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा