मुंबईच्या वेशीवरच रस्त्याची चाळण


  • मुंबईच्या वेशीवरच रस्त्याची चाळण
  • मुंबईच्या वेशीवरच रस्त्याची चाळण
SHARE

चेंबूर - मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या चेंबूरमधील पांजरपोळ सर्कलच्या रस्त्यांची पालिका आणि एमएमआरडीएने डागडुजी केली होती. मात्र सध्या येथील सिमेंटचे रस्ते सोडल्यास डांबरी रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे. तीन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या इस्टर्न फ्री वे आणि सायन-पनवेल मार्गावरील पांजरपोळ सर्कल हे मुख्य प्रवेशद्वार आहे.

दररोज या सर्कलवरुन हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. अशातच गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली आहे. याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाहनचालकांसह वाहतूक पोलिसांना देखील सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिका आणि एमएमआरडीएने तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या