SHARE

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची दुरूस्ती करणं गरजेचं असतं. बेस्ट कर्मचारी वसाहतींच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो. मात्र, स्ट्रक्चरल आॅडिटनुसार ६ महिन्यांपूर्वी तातडीनं दुरुस्ती करण्याची गरज असते. परंतु. परळ येथील कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. वसाहतीची दुरूस्ती होत नसल्यामुळं तसंच, प्रशासनाच्या दर्लक्षामुळं सर्वपक्षीय सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.

सदस्यांमध्ये चर्चा

बेस्ट समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत या वसाहतीबाबत सदस्यांमध्ये चर्चा झाली. या वसाहतीमध्ये १,०६० कर्मचारी कुटुंबासह राहत आहेत. ही इमारत धोकादायक झाली असून, अनेक वेळा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळं रहिवासी हवालदिल झाले असल्याचं मत सदस्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, महाव्यवस्थापकांनी स्वत: तेथे पाहणी केली होती. मात्र, परळ कर्मचारी वसाहतीमधील ए, एम, ओ, पी इमारतींचा छज्जा आणि ड्रॉप वॉल कापून काढण्याच्या कामाचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पटलावर मांडण्यात आला.

तीव्र नाराजी व्यक्त

यासंदर्भात सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसाहतींचा मेंटेनन्स कापून घेता, मग त्यांना नागरी सुविधा का देत नाही? असा सवाल सदस्यांनी केला. मुंबईतील सर्व बेस्ट कर्मचारी वसाहतींचे स्ट्रक्चरल आॅडिट व्हीजेटीआय, आयआयटीसारख्या संस्थांकडून करून घ्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्यानुसार, इमारतीच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलण्यात येतील, असं आश्वासन देण्यात आलं.हेही वाचा -

मुंबईत आयटीआयच्या 'इतक्या' जागा रिक्त

पवारांची लिलावतीत संजय राऊतांशी गुप्तगूसंबंधित विषय
ताज्या बातम्या