Advertisement

मुंबईत आयटीआयच्या 'इतक्या' जागा रिक्त


मुंबईत आयटीआयच्या 'इतक्या' जागा रिक्त
SHARES

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दहावीनंतर प्रवेशप्रक्रिया राबविण्यता आली. या प्रवेश प्रक्रियेत राज्यात २९ हजार ९५९ जागा रिक्त राहिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मुंबईतील रिक्त जागांची संख्या ३,९५२ इतकी आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्यात एकूण १ लाख १८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (डीव्हीईटी) प्रशासनानं दिली.

प्रवेश प्रक्रिया

आयटीआय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया डीव्हीईटीकडून राबविण्यात आली. दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी प्रवेश प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यात आला होता. ही प्रवेश प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद काहीसा घटला आहे. सरकारी आयटीआयमध्ये रिक्त राहिलेल्या जागांची संख्या खासगी आयटीआयच्या तुलनेत कमी आहेत.

हेही वाचा - पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात दोन लेखापरीक्षकांना अटक

विद्यार्थ्यांचा प्रवेश

सरकारी आणि खासगी आयटीआय मिळून एकूण एक लाख ४८ हजार २४६ प्रवेश क्षमता आहे. त्यानुसार, १ लाख १८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २९ हजार ९५९ जागा रिक्त राहिल्या आहेत. यापैकी १९ हजार ९४९ जागा खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहिल्या आहेत. तसंच, १० हजार १० खासगी जागा रिक्त राहिल्या आहेत.

आयटीआयसाठी प्रवेश

विभाग 
प्रवेशक्षमता 
प्रवेश 
रिक्त
पुणे 
३१,०९८ 
२३,४२० 
३७,६७८
अमरावती 
१८,४१६ 
१६,२५४ 
२,१६२
औरंगाबाद 
२०,१२८ 
१५,८३५ 
४,२९३
मुंबई 
२०,९६४ 
१७,०१२ 
३,९५२
नागपूर 
२८,१९६ 
२२,३५३ 
५,८४३
नाशिक 
२९,४४४ 
२३,४१३ 
६,०१३



हेही वाचा -

हम होंगे कामयाब, जरूर होंगे- संजय राऊत

एमटेकच्या शुल्कवाढीमुळं विद्यार्थी नाराज, आंदोलनाचा इशारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा