Advertisement

हम होंगे कामयाब, जरूर होंगे- संजय राऊत


हम होंगे कामयाब, जरूर होंगे- संजय राऊत
SHARES

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्यानं सोमवारी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आली. लिलावती रुग्णालयात अॅंजिओप्लास्टी झाल्यानंतर विश्रांती घेणारे संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केलं आहे.

सत्तास्थापनेचा दावा

'लहरों से डरकर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नही होती', या कवितेच्या ओळी ट्विट करत 'हम होंगे कामयाब, जरूर होंगे', असं वक्तव्य केलं आहे. सोमवारी संध्याकाळी शिवसेनेची सत्तास्थापनेचा दावा करण्याची मुदत संपल्यानं राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निमंत्रित केलं आहे. मात्र, आमचा दावा संपलेला नसल्याचे सांगत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आमची लढाई संपलेली नसल्याचं सूचित केलं होतं.

हेही वाचा - राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण, पण संख्याबळाचं काय?

शिवसेनेची भूमिका

मागील अनेक दिवस राऊत शिवसेनेची भुमिका मांडत सतत पत्रकारांशी बोलत होते. सर्व आघाड्यांवर कार्यरत राहत राऊत यांनी शिवसेनेचे बाजू जोरकसपणे मांडण्याचं काम केलं. या ताणतणावाच्या परिस्थितीचा मोठा ताण संजय राऊत यांच्यावर होता. राऊत यांच्यावर काही दिवसांपूर्वी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ अजित मेनन यांनी उपचार केले आहेत. मात्र, सोमवारी पुन्हा त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.हेही वाचा -
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी, रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही
राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण, पण संख्याबळाचं काय?


संबंधित विषय
Advertisement