राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यामागील सस्पेन्स अद्याप कायम आहे. काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास होकार दिल्याने संध्याकाळी उशीरा शिवसेनेच्या जीवात जीव आला. त्यानुसार राज्यपालांना भेटून शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावाही केला आहे. परंतु राज्यपालांनी देलेल्या मुदतीत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचं पत्र देण्यात अपयश आलं. शिवसेनेने राज्यपालांकडे कालावधी वाढवण्याची केलेली विनंती देखील राज्यपालांनी फेटाळून लावली. यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट येणार की महाआघाडीचं सरकार? यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.
हेही वाचा-छातीत दुखू लागल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात
राज्यपालांना भेटून आल्यानंतर आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भाजपला दिलेली सत्तास्थापनेची मुदत संपलेली नसतानाच शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांना राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचं निमंत्रण देणारं पत्र मिळालं. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी केवळ २४ तासांचीच मुदत देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्राच्या भल्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आहे. परंतु त्यासाठीची अंतिम बोलणी करण्यासाठी आम्हाला किमान ४८ तासांची गरज असल्याने आम्ही राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली आहे. परंतु आम्हाला राज्यपालांनी सध्या तरी वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे.
याआधी काँग्रेसच्या भूमिकेनंतरच आपला निर्णय कळवणार, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याने सगळ्यांच्या नजरा काँग्रेसच्या बैठकीकडे लागल्या होत्या. राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात तब्बल २ तासांहून अधिक काळ बैठक सुरू होती. काँग्रेसच्या ४४ आमदारांपैकी ४० आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा असला, तरी सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास फारशा उत्सुक नसल्याने त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू होता.
Maharashtra: Shiv Sena leader Aaditya Thackeray and other leaders of the party reach Raj Bhavan, in Mumbai. pic.twitter.com/6dL1yiMm9C
— ANI (@ANI) November 11, 2019
अखेर आपल्या नेत्यांचं म्हणणं ऐकत त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचं ठरवल्याचं म्हटलं जात होतं. सोनिया यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून त्यासंबंधीची माहिती देखील दिली.
हेही वाचा- म्हणून दिला राजीनामा, काय म्हणाले अरविंद सावंत?
त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, अनिल परब आणि सुभाष देसाई यांनी राजभवनला पोहोचून राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संख्याबळाचं पत्र राज्यपालांनी घालून दिलेल्या मुदतीत शिवसेनेला देता न आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम राहिला आहे.
हेही वाचा-
‘या’ मुद्द्यावर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत!
उद्धव ठाकरेंनी केला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन