Advertisement

छातीत दुखू लागल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात

सत्तास्थापनेवरून राज्यात राजकीय खलबतं सुरू असताना. त्यात शिवसेनेकडून महत्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

छातीत दुखू लागल्यामुळे  संजय राऊत रुग्णालयात
SHARES

सत्तास्थापनेवरून  राज्यात राजकीय खलबतं सुरू असताना. त्यात शिवसेनेकडून महत्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राऊत यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लिलावतीचे प्रसिद्ध डाॅक्टर अजित मेनन याच्या मार्गदर्शनाखाली राऊत यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही, याचं खापर शिवसेनेवर फोडणं चुकीचं - संजय राउत

शिवसेनेचं सरकार सत्तेत यावं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी संजय राऊत मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत  बैठका करत आहेत. वेळोवेळी त्यांनी पुढे येऊन शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडली. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर संजय राऊत दुसऱ्या दिवसापासून माध्यमांद्वारे चर्चेत राहिले होते. सोमवारी पक्षाच्या बैठकीला जात असताना, राऊत यांच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यावेळी त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राऊत यांना रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी लिलावतीच्या दिशेने धाव घेतली आहे. 

हेही वाचा- शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी मला शहा, फडणवीस यांची गरज नाही- उद्धव ठाकरे

रुग्णालयातील प्रसिद्ध डाॅ. अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना पुढचे २ दिवस रुग्णालयात काढावे लागणार आहेत. राऊत त्यांना २ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर अँजिओग्राफी होण्याची शक्यता आहे. गेल्या २ दिवसांपासून त्यांना हा त्रास जाणवत होता, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे शिवसेनेची सत्तास्थापनेची पुढची भूमिका कोण बजावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी राऊत यांच्यावरील जबाबदारी अनिल परब, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आली.


हेही वाचा-

म्हणून दिला राजीनामा, काय म्हणाले अरविंद सावंत?

काँग्रेसच्या निर्णयानंतरच आमचाही निर्णय, राष्ट्रवादीची भूमिका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा