Advertisement

म्हणून दिला राजीनामा, काय म्हणाले अरविंद सावंत?

केंद्रातील भाजपप्रणित लोकशाही आघाडी सरकारमधील शिवसेनेचे खासदार आणि अवजड उद्योग-सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा सोमवारी राजीनामा दिला.

म्हणून दिला राजीनामा, काय म्हणाले अरविंद सावंत?
SHARES

केंद्रातील भाजपप्रणित लोकशाही आघाडी सरकारमधील शिवसेनेचे खासदार आणि अवजड उद्योग-सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा सोमवारी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले सावंत?

लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचं सूत्र ठरलं होतं. दोन्ही पक्षांना हे सूत्र मान्य होतं. तरीही विधानसभा निवडणूक झाल्यावर अशी कुठलीच बोलणी झाली नाही असं सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे दोन्ही पक्षांतील विश्वासार्हतेला मोठा तडा गेला. अशा स्थितीत आपण केंद्रात मंत्री म्हणून राहणं नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याने आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवल्याचं सावंत यांनी सांगितलं. 

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना केंद्रातील एनडीएमधून बाहेस पडल्याचं मानले जात आहे. याआधी ट्विट करत शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचं? असा प्रश्न उपस्थित करत आपण केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं.



हेही वाचा- 

काँग्रेसच्या निर्णयानंतरच आमचाही निर्णय, राष्ट्रवादीची भूमिका

‘या’ मुद्द्यावर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा