Advertisement

‘या’ मुद्द्यावर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत!

काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्यास थोडा वेळ घेत आहे. परंतु एका मुद्द्यावर मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत आहे.

‘या’ मुद्द्यावर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत!
SHARES

शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यायचा की नाही, यावर सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खल सुरू आहे. राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं असून सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत शिवसेनेला आपलं संख्याबळ दाखवायचं आहे. विचारधारा वेगळी असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्यास थोडा वेळ घेत आहे. परंतु एका मुद्द्यावर मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी अपेक्षित संख्याबळ नसल्याने त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. या अस्थिरतेमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असा अप्रत्यक्ष प्रयत्न देखील होत असल्याचं म्हटलं जात आहे. हा प्रयत्न हाणून पाडत राज्यातील अस्थिरता संपवण्यासाठी कुठल्याही प्रकारे सरकार स्थापन व्हावं, यावर या तिन्ही पक्षांचं एकमत आहे.

हेही वाचा- भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही, याचं खापर शिवसेनेवर फोडणं चुकीचं - संजय राउत

शिवाय फोडाफोडीचं राजकारण करण्यात पटाईत असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची कुठलीही संधी मिळू न देता राजकीय गणितं जुळवून आणण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत, यावरही या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता आहे.

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून आम्ही कुठलीही अट घातलेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल इ. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून घेणार आहेत. 



हेही वाचा-

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे आमदार जयपूरहून मुंबईकडे रवाना?

उद्धव ठाकरेंनी केला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा