Advertisement

भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही, याचं खापर शिवसेनेवर फोडणं चुकीचं - संजय राउत


भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही, याचं खापर शिवसेनेवर फोडणं चुकीचं - संजय राउत
SHARES

शिवसेनाा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. 'भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही. याचं खापर शिवसेनेवर फोडणं चुकीचं आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार कार्यवाही झाली असती, तर भाजपावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली नसती. प्रसंगी विरोधी बाकावर बसू पण, शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही. या अंहकाराच्या भूमिकेतून भाजपावर ही वेळ आली आहे', असं संजय राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा - काँग्रेस आमदारांची शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी? आता लक्ष हायकमांडकडे

सत्ता स्थापनेचा वाद

एकीकडं महायुतीचा सत्ता स्थापनेचा वाद सुटत नाही, तर दुसरीकडं संजय राऊत मागील अनेक दिवस पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भुमिका मांडत आहे. तसंच, सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं सत्ता स्थापनेचा वाद आता टोकाला गेला आहे.

हेही वाचा - भाजपला सरकार स्थापनेचं निमंत्रण, पण बहुमताचा आकडा कसा गाठणार?

शिवसेनेला कमी वेळ

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार बनविण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतची वेळ दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. भाजपाला सरकार बनविण्यासाठी राज्यपाल यांनी ७२ तासांची वेळी दिली होती. परंतु, शिवसेनेला केवळ २४ तासांची वेळ दिल्याचं मतही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

एसटीनं आता रात्रीचा प्रवास होणार आणखी सुखकर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा