Advertisement

एसटीनं आता रात्रीचा प्रवास होणार आणखी सुखकर

एसटीच्या ताफ्यात नवीन बनावटीच्या २० बस दाखल झाल्या आहेत.

एसटीनं आता रात्रीचा प्रवास होणार आणखी सुखकर
SHARES

एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीच्या ताफ्यात नवीन बनावटीच्या २० बस दाखल झाल्या आहेत. विनावातानुकूलित ३० आसनी आणि १५ स्लीपर असा ४५ सीटच्या बस कोल्हापूर आगारात दाखल झाल्या आहेत. पारगड (कोल्हापूर) ते परळ, पाटगाव (कोल्हापूर) ते परळ, चिखली (बुलडाणा) ते मुंबई सेंट्रल, सांगली ते मुंबई सेंट्रल, अमळनेर (जळगाव) ते मुंबई सेंट्रल या मार्गावरून नवीन बनावटीच्या बस धावणार आहेत.

रातराणी बस

या बस रातराणी बसच्या जागी लांब पल्ल्यांच्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळं रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होणार आहे. रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शयनयान वातानुकूलित एसटीचं तिकीट दर परवडत नाहीत. त्यामुळं विनावातानुकूलित शयनयान बस बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्याप्रमाणे, २० नवीन बनावटीच्या बस बांधण्यात आल्या.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात होण्याची शक्यता

२०० बस

एमजी आॅटोमोटिव्हस या कंपनीनं या बसची बांधणी केली आहे. येत्या काळात नवीन बनावटीच्या २०० बस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. या नवीन बनावटीचं तिकीट दर निमआराम बसप्रमाणंच असणार आहे. आरामदायी आसन, प्रवाशांसाठी छोट्या आकाराचा पंखा, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, अशा सुविधा या बसमध्ये देण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

'हा' उन्नत मार्ग कोणत्याही समारंभाविना वाहतुकीस खुला

पहिली 'लेडीज स्पेशल' ट्रेन धावली मुंबईत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा