Advertisement

काँग्रेसच्या निर्णयानंतरच आमचाही निर्णय, राष्ट्रवादीची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा आपला निर्णय लांबणीवर टाकल्याने सर्वांना आता प्रतीक्षा लागलीय ती काँग्रेसच्या निर्णयाची.

काँग्रेसच्या निर्णयानंतरच आमचाही निर्णय, राष्ट्रवादीची भूमिका
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा आपला निर्णय लांबणीवर टाकल्याने सर्वांना आता प्रतीक्षा लागलीय ती काँग्रेसच्या निर्णयाची. काँग्रेसने निर्णय घेतल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली भूमिका एकमताने जाहीर करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. 

हेही वाचा- शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे आमदार जयपूरहून मुंबईकडे रवाना?

भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, हे जाहीर केल्याने अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून राज्यात पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही आमचा अंतिम निर्णय काँग्रेसशी चर्चा करूनच एकत्रित घेऊ, असं शरद पवार यांनी देखील याआधीच सांगितलं होतं. त्यानुसार जो पर्यंत काँग्रेस आपली भूमिका ठरवत नाही, तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसही आपली भूमिका जाहीर करणार नाही, असं मलिक म्हणाले. 

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? हे ठरवण्यासाठी काँग्रेसने सोमवारी सायंकाळी ४ वाजता दिल्लीत बैठक बोलवली आहे. या बैठकीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली भूमिका जाहीर करेल, हे आता स्पष्ट झालंआहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा-

‘या’ मुद्द्यावर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत!

भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही, याचं खापर शिवसेनेवर फोडणं चुकीचं - संजय राउत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा