Advertisement

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी, रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही


प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी, रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही
SHARES

एसटी आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. रेल्वे स्थानकांतील अनियंत्रित गर्दीवर नियंत्रण मिळविण्यसाठी रेल्वे आणि एसटी प्रशासनानं सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानक सुरक्षा योजनेंतर्गत ३० रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त १५०० सीसीटीव्ही उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. त्याशिवाय मुंबईसह राज्यातील ३६३ एसटी स्थानकांवर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांतील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेनं स्थानक सुरक्षा योजना तयार केली आहे.

सीसीटीव्हीची नजर

या योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांवरील प्रवासी संख्या लक्षात घेता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. या सीसीटीव्हीची जोडणी स्थानिक रेल्वे सुरक्षा बल आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या कक्षात देण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या ३० रेल्वे स्थानकांत अतिरिक्त १५०० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

हेही वाचा - जोरदार पावसाचा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

११७५ सीसीटीव्ही

सध्यस्थितीत या रेल्वे स्थानकांत एकूण ११७५ सीसीटीव्ही सुरू आहेत. तसंच, योजनेनुसार उर्वरित सीसीटीव्ही येत्या ८ महिन्यांत बसवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. सीसीटीव्हीसह स्थानकांतील प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या गेटला क्रमांक देणं, सरकत्या जिन्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना करणं या मुद्द्यांचा समावेश या योजनेत आहे.

चोरीला आळा

एसटी स्थानकांतील चोरीला आळा घालणं, फलाटांवरील एसटी अपघातांत चित्रिकरणाचा पुरावा म्हणून वापर, स्थानकात येऊन प्रवासी घेणाऱ्या अनधिकृत वाहनांवर कारवाई करणं या कारणांसाठी एसटी स्थानकांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. एसटी स्थानकांतील प्रवासी संख्या, गाड्यांच्या फेऱ्या लक्षात घेऊन किमान ४ आणि कमाल १८ सीसीटीव्ही एसटी स्थानकांवर असणार आहेत.

हेही वाचा - सावधान...रेल्वे ट्रॅक ओलांडल्यास तुम्हाला उचलेल यमराज

अधिकाऱ्यांकडून पाहाणी

या सीसीटीव्हीची जोडणी विभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात देण्यात येणार आहे. तसंच, विभागीय अधिकारी याची पाहणी करणार आहेत. या योजनेच्या अंतर्गत सीसीटीव्ही कार्यरत करण्यासाठी महामंडळाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सीसीटीव्हीचा आढावा घेण्यात येत आहे.

हेही वाचा - पश्चिम रेल्वेवर धावणार महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल

एसटी स्थानकांचं बांधकांम

मुंबई सेंट्रल, कुर्ला-नेहरूनगर, परळ स्थानकांसह राज्यातील एकूण ४९३ एसटी स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी सद्यस्थितीत ३६३ एसटी स्थानकांतील सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित एसटी स्थानकांची बांधकामं सुरू आहेत. त्यामुळं या स्थानकांत बांधकाम पुर्ण झाल्यानंतर सीसीटीव्ही कार्यन्वित करण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण, पण संख्याबळाचं काय?

शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा, मात्र वेळ निघून गेली...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा